शिवस्मारकाच्या उंचीबाबत राज्य सरकारने दिलेल्या प्रस्तावाला पर्यावरण खात्याने हिरवा कंदील दिल्या मुळे या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे शिवस्मारकाची उंची १९२ मीटर ऐवजी २१० मीटर पर्यंत वाढवणायत येणार आहे..त्यामुळे मुंबई तील अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारक जगातील सर्वात उंच स्मारक ठरणार आहे..सध्या चीन मध्ये लुशनकौंटी येथील स्प्रिंग टेम्पल मधील बुद्धाचा पुतळा हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे..२००८ मध्ये ह्या पुतळ्याचे काम पूर्ण झाले असून ह्याची उंची २०८ मीटर इतकी आहे ..गिरगाव चौपाटी पासून समुद्रात सुमारे साडेतीन किलोमीटर वर हे स्मारक उभे केले जाणार आहे ..ह्याच्या पहिल्या टप्प्यात २३०० कोटी खर्च अपेक्षित आहे ..स्मारक जवळ शिवाजी महाराजांची माहिती देणारे दालन,पुस्तक प्रदर्शन,वस्तू संग्रहालय आणि त्यांचे जीवन पट उलघडण्यासाठी एक थिएटर हि असणार आहे
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews